आई चरणी स्वर्ग

जगातील कोणताही धर्म आणि कोणतीही संस्कृती अशी नसेल जी आईवडिलांच्या प्रती आदरभावाची शिकवण देत नाही. माझ्या अभ्यासात तर आजपर्यंत एकही संस्कृती अशी आलेली नाही. जर एखादी असेलच तर ती अपवादच समजावी लागेल. इस्लामधर्मात देखील आईवडिलांच्या अधिकाराबाबत दक्ष राहण्याची शिकवण देण्यात आली आहे. इस्लामध्ये अल्लाहचे सार्वभौमत्व मान्य केल्यानंतर दुसरे स्थान आईवडिलांचे आहे. मी येथे जाणूनबुजून आई… Continue reading आई चरणी स्वर्ग

मुस्लिमांचे हिंदुराष्ट्र

भारताची फाळणी देशाच्या राजकीय अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे हे नाकारता येत नाही. फाळणी लपवून किंवा नजरेआड करून भारतीय जनतेची मानसिकता आणि राजकारणाची दिशा समजताच येणार नाही. कारण देशाच्या राजकारणाला निर्णायक दिशा देण्याचे आणि भारतीय समाजमन घडविण्याचे काम फाळणीने केले आहे. म्हणून आजच्या राजकीय परिस्थितींचा अभ्यास करताना आणि भारतीय समाजमनाचा अभ्यास करताना फाळणी समजून घेणे अत्यंत गरजेचे… Continue reading मुस्लिमांचे हिंदुराष्ट्र

उचलली जीभ लावली टाळ्याला

माझ्या मित्राच्या मावस भावाला डेन्मार्क देशी प्रोफेसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वर्षाकाठी तो स्वदेशी परत येत असतो. २ महिन्यांची सुट्टी घेऊन. येथे राहतो, नातलगांकडे फिरतो, तिथले अनुभव कथन करतो. नेहमीच काहीतरी चांगलं शिकविण्याचा प्रयत्न करतो. व्हीलचेअरवर बसून त्याने नशिबाला त्याच्यासमोर वाकायला भाग पाडलं. जन्मतः विकलांग असणारा हा पोरगा काय करणार म्हणारे त्याच्या कर्तत्वाला पाहून… Continue reading उचलली जीभ लावली टाळ्याला

अजान

मानवी स्वभाव आहे की ज्या विषयाबद्दल तो अज्ञानी असतो त्या विषयाबद्दल तो भयांकित असतो, भयग्रस्त असतो. अंधारात भीती वाटण्याचे मुख्य कारण हेच की तो सभोवतालला ओळखत नाही, म्हणून त्याला भीती वाटते. प्रकाशाची एक छोटीशी किरणही त्याला सापडली तर तो त्या दिशेने धावत सुटतो. प्रकाशात सर्व काही उजळून निघाल्यानंतर तो भयातून मुक्त होतो. इस्लामबद्दल असचं काहीसं… Continue reading अजान

‘फतवा’ असतो तरी काय?

'फतवा' हा शब्द कानावर आदळताच समाजात काय खळबळ निर्माण होते सांगायला सोय नाही. विशेषकरून मागील १०-१५ वर्षाच्या मीडिया हॅमरिंगचा हा परिणाम आहे. जुन्या पिढीला तर फतवा हा शब्द परिचयाचादेखील नसेल किंवा त्यांचा जो काही परिचय आला तो मागील १०-१५ वर्षातच आला असेल. मानवी प्रवृत्ती आहे की ज्या विषयाबद्दल तो अज्ञानी असतो त्या विषयाबद्दल तो भयांकित… Continue reading ‘फतवा’ असतो तरी काय?

नाहिद अफरीन आणि फतवा

काल देशासमोर एक महाभयंकर राष्ट्रीय संकट निर्माण झाले. आसामच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट करून त्या संकटाचा सामना करावा लागला. काही शरणार्थीनी देखील या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून स्वार्थी लाळ गळायला सुरुवात केली. देशाच्या हितासाठी अहोरात्र आपले प्राण पणाला लावून देशहित सध्या करू पाहणाऱ्या मीडियाने आणि त्यातील संत लोकांनी या राष्ट्रीय संकटाचा सामना कसा करावा… Continue reading नाहिद अफरीन आणि फतवा

डॉ. कृष्णा किरवले यांचे इस्लामबद्दलचे विचार

दलित साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची दुर्दैवी हत्या घडली. या हत्येमागचे मूळ काय हे तर आताच सांगता येणार नाही. कारण त्या संदर्भात कसलीही विश्वसनीय माहिती आपल्याकडे नाही. घटना का घडली आणि एकूण घटनाक्रम काय आहे, हे जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत शांत बसून बघ्याची भूमिका घेण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणून सध्या… Continue reading डॉ. कृष्णा किरवले यांचे इस्लामबद्दलचे विचार

मातृभाषा

आज मी परत एकदा तुमच्या समोर आलोय. परत तोच अंदाज घेऊन जो ‘राजा शिवाजी आणि मुसलमान’ या लेखाचा होता. परंतु आज विषय मोठा गहन आहे. २१ फेबु जागतिक पातळीवर मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असताना आपल्या देशात याबद्दल किती जागृती आहे? आज २७ फेबु निमित्ताने आपल्या राज्यात, महाराष्ट्रात, मातृभाषेबद्दल बोलले जात आहे कारण आज… Continue reading मातृभाषा

पद्मावती

मानव कल्पना विश्वात रमणारा प्राणी आहे. प्रत्यक्ष आयुष्याचा बराचसा भाग तो कल्पनेत जगत असतो. या कल्पनांना साकार स्वरूप देण्याचा प्रयत्नही तो करत असतो. पुरुषाच्या आपल्या पत्नीला घेऊन काही कल्पना असतात, त्या कल्पनांच्या पूर्तीसाठी तो तिला आपल्या कल्पनेतील 'राणी' 'मलिका' गृहीत धरीत असतो. पित्याच्या आपल्या मुलांबाबत काही कल्पना असतात. मुलांच्या आपल्या वडीलांबाबत काही कल्पना असतात. परंतु… Continue reading पद्मावती

जल्लीकट्टू

दुधाचे प्रकार: दुधाचे २ प्रकार. A1 आणि A2. A1 म्हणजे मानवी हस्तक्षेप (इंजेकशन, विविध औषधेंच्या माध्यमातून) असलेले दुध आणि A2 म्हणजे कसलाही मानवी हस्तक्षेप नसलेले दुध. दुधाचे उत्पन्न जास्तीत जास्त व्हावे आणि जास्तीत जास्त नफा मिळविता यावा यासाठी मानवी हस्तक्षेप. A2 दूध A1 पेक्षा कित्येक पटीने चांगले कारण यात बिटाकॅसिन अमिनो ऍसिड चे प्रमाण नैसर्गिक… Continue reading जल्लीकट्टू