आई चरणी स्वर्ग

जगातील कोणताही धर्म आणि कोणतीही संस्कृती अशी नसेल जी आईवडिलांच्या प्रती आदरभावाची शिकवण देत नाही. माझ्या अभ्यासात तर आजपर्यंत एकही संस्कृती अशी आलेली नाही. जर एखादी असेलच तर ती अपवादच समजावी लागेल. इस्लामधर्मात देखील आईवडिलांच्या अधिकाराबाबत दक्ष राहण्याची शिकवण देण्यात आली आहे. इस्लामध्ये अल्लाहचे सार्वभौमत्व मान्य केल्यानंतर दुसरे स्थान आईवडिलांचे आहे. मी येथे जाणूनबुजून आई… Continue reading आई चरणी स्वर्ग

मान्य करा तिचा नकार

तिची लेखमाला भाग - ७ खुलअ - फारकत वर दोघेही सहमत: विवाह या पवित्र नात्यातुन प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात. काही स्वप्ने असतात. मनासारखा जोडीदार लाभावा म्हणून आपण सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. परंतु इतके करूनही काही जोडप्यांच्या हाती निराशाच लाभते. झालं ते गेलं म्हणून कित्येक जोडपे तडजोडीचे आयुष्य जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. जोडीदार असूनही आपले… Continue reading मान्य करा तिचा नकार

तलाक म्हणजे काय रे भाऊ?

तिची लेखमाला भाग - ६ इस्लाम आणि विवाह: इस्लामनुसार विवाह एक बंधन नसून कराररूपी नाते आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हा करार करायचा असतो. विवाहासाठी दोन्ही पक्षांचे सहमत असणे अनिवार्य आहे. मुलीच्या सहमतीशिवाय तिचा विवाह केला जाऊ शकत नाही. तसेच वरपक्षाला धोक्यात ठेऊन विवाह केला जाऊ शकत नाही. दोन्ही आपल्या मर्जीने विवाह करत असतील तरच… Continue reading तलाक म्हणजे काय रे भाऊ?

जाऊ द्या तिला

तिची लेखमाला भाग - ५ लग्न आणि घडस्फोट हा प्रत्येक जोडप्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. परंतु लग्नाच्या मान्यतेसाठी तसेच घटस्पोटासाठी काही सामाजिक निर्बंध आज प्रत्येक समाजात जोडप्यावर लादण्यात आले आहेत. अर्थातच हे सामाजिक निर्बंध सामाजिक जाणीवेतून निर्माण करण्यात आलेले काही नियम आणि कायदे आहेत. यांना क्षति पोचल्यास समाज व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. समाजशास्त्राचा अभ्यासू विद्यार्थी… Continue reading जाऊ द्या तिला

बना एक आदर्श पती

तिची लेखमाला भाग - ४ विवाह एक 'पवित्र बंधन' नसून एक 'पवित्र नातं' आहे. हे नाते पवित्र राखणे दोघांवर अनिवार्य आहे. पती-पत्नी एकमेकांचे जोडीदार आहेत. दोन अनोळख्या व्यक्तींना जोडणारी एकच भावना आहे, जी या नात्याची आत्मा आहे. ती भावना म्हणजे 'प्रेम'! कुरआन या भावनेबद्दल भाष्य करताना म्हणतो "त्याने तुमच्या दरम्यान प्रेम व करुणा उतपन्न केली"(दिव्य… Continue reading बना एक आदर्श पती

निवडू द्या तिला जीवनसाथी

तिची लेखमाला भाग - ३ स्त्रियांच्या विश्वाशी निगडीत हा माझा तिसरा लेख. पहिल्या दोन्ही लेखांना माझ्या मित्रांचा आणि अभ्यासकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जन्म आणि घरातील असमान वागणुकीवर प्रकाश टाकल्यावर आता मी तिच्या विवाहाशी निगडीत चर्चा करणार आहे. जीवनसाथी हा जीवनाचा प्रश्न: जीवनसाथी हा आयुष्याचा जोडीदार असतो. ज्याच्या सोबत संपूर्ण जीवन जगायचे… Continue reading निवडू द्या तिला जीवनसाथी

वाढवा तिला सन्मानाने

तिची लेखमाला भाग - २ स्त्रीभ्रूण हत्येवर मागील लेखात चर्चा केल्यानंतर या लेखात मी स्त्रीची एक मुलगी म्हणून जगताना होणारी कुचंबणा आपल्यासमोर मांडणार आहे. ज्यांना मुलगी नकोच असे कुटुंब स्त्रीभ्रूण हत्येचा मार्ग स्वीकारून तिची गर्भातच हत्या करून मोकळे होतात. परंतु जे हत्या करू शकत नाहीत किंवा ज्यांना हत्या करणे पटत नाही, तसेच ज्यांना मुली हव्या… Continue reading वाढवा तिला सन्मानाने

जगू द्या तिला

तिची लेखमाला भाग - १ जगाने स्त्रीचा नेहमीच उपभोग घेतला आहे आणि आजही उपभोग घेतला जात आहे. (स्त्री-पुरुषाला एकमेकांप्रती असलेल्या नैसर्गिक अकर्षणाच्या पलीकडे) पुरुषाला पुरातन काळापासून स्त्रीदेहाची तहान आहे. पोटासाठी आपल्या कुटुंबासाठी धडपडणारा, काबाडकष्ट करून जगणारा गरीब ही तहान वैध रीतीने शमवित (लग्न करून) असतो तर समाजाची साधन संपत्ती हातात असल्याने जगाचा उपभोग घेऊ पाहणाऱ्या… Continue reading जगू द्या तिला